> तुमच्या म्हणण्यानुसार वस्त्रे कशी, किती लांबीची इत्यादी तपशीलांपेक्षा ती घालणारी व्यक्ती - तिची मानसिकता हे पुरुषाला वाटणाऱ्या त्या ''आकर्षणाची परिसीमा'' व्हायचे किंवा नाही हे ठरवतात, बरोबर ना?

= हो, प्रश्न वस्त्रं परिधान करणाऱ्या स्त्रीच्या मानसिकतेचा आहे, निमंत्रण तिचं आहे, तुम्ही आकर्षित झालेल्याचा विचार प्रथम करतायं, त्याला आकर्षित कुणी आणि कसं केलं ते पहा मग तुम्हाला प्रतिसाद कळेल. 

> आखूड स्कर्ट घालणाऱ्या स्त्रीची मानसिकता तिच्या ड्रेसवरून ठरवायची का?

= आपला देह किती दाखवायचा हे वस्त्र परिधान करणारी स्त्री ठरवते का पहाणारे ठरवतात?

>मग साडी नेसणाऱ्या स्त्रीची मानसिकताही तिच्या ड्रेसवरून ठरवता येईल का? साडी नेसणारी कोणीही स्त्री इतरांना आकृष्ट करत नसेल असेच मग म्हणावे लागेल.

= मुद्दा तुमच्या लक्षात आला नाही, एकच साडी देह झाकण्यासाठी ही वापरता येईल आणि देहप्रदर्शनासाठी ही वापरता येईल (रा वनच्या पोस्टरवरची  करीना पहा)

>पण वर तर तुम्ही म्हणता की मल्लिकाच्या बाबतीत ती आकर्षणाची परिसीमा असेल.

= कारण मल्लिकाला देहप्रदर्शानात रस आहे, देह झाकण्यात नाही.

>स्त्रीने वस्त्रांचा उपयोग शरीर झाकणे की देहाचे प्रदर्शन करण्यासाठी करायचा हे कोण ठरविणार?

= अर्थात स्त्रीच!

> मग सर्वसमावेशक व्याख्या तरी सांगा.

= तुम्ही शांतपणे वाचा, माझं म्हणंण इतकंच आहे की वस्त्र दुय्यम आहे, ते परिधान करणारी स्त्री प्रार्थमिक आहे आणि जिला देहप्रदर्शन करायचंय ती कोणत्याही वस्त्रात ते करणारच मग ती साडी असो की जीन पँट-शर्ट की नऊवारी, कारण तिचा हेतूच दुसऱ्याला आकर्षित करण्याचा आहे.

संजय