मनुष्याला तोच तोच पणा नकोसा होऊन नवे काहीतरी अंगीकारावेसे वाटते. यातूनच वेगवेगळ्या स्टाइल्स अथवा पद्धती प्रचारात येतात. 'मार्केट ट्रेंड' च्या दृष्टीतून आपण अद्ययावत असावे असे बहुतेकांना वाटते. काही वर्षांपूर्वी बाह्याविरहित 'पोटिमा' ची स्टाइल होती. त्यानंतर पूर्ण बाह्या, अर्ध्या बाह्या, पाऊण बाह्या अशा पद्धती बदलत गेल्या. आत्ताआत्तापर्यंत लांब अनारकली कमीज ची हवा होती, मग तोकडा अनारकली आला, आणि सध्या तर सलवार कमीजही वापरातून बाद होत आहेत. पेडल पुशर्स, डिवाय्डर्स,स्लॅक्स,लेगिन्स, ह्या सर्वांची काही काळापुरती चलती राहिली आहे.(हे सर्व मी बायकांच्या पेहेरावाबद्दलच लिहिले आहे. कारण पुरुषांनी कसाही आणि कोणताही पेहेराव केला तरी स्त्रिया उत्तेजित अथवा विचलित होण्याची सुतराम शक्यता नाही.) सतत नव्याची ओढच याचे कारण आहे. पुरुषांना आकर्षित करण्याचे कारण नसावे,नसते.
जाता जाता : आणि पुरुषांनीही सारखे सारखे, जरा काय झाले की विचलित आणि उत्तेजित होण्याची आपली सवय सोडून द्यावी. कसे?