बलात्कारात तुम्हाला कोठेही विकृती, मनाचा विकार - आजार दिसून येत नाही हे
आश्चर्यच आहे!! ते काय मिठाईच्या दुकानात मिठाई दिसली - तोंडाला पाणी सुटले
- खिशात पैसे नव्हते - म्हणून हात मारून झडप घालून मिठाई पळवली व खाल्ली
इतके सोपे आहे का?
१. मिठाईच्या दुकानात मिठाई दिसली - तोंडाला पाणी सुटले - खिशात पैसे नव्हते - म्हणून हात मारून झडप घालून मिठाई पळवली व खाल्ली... हे आपणास सोपे वाटते काय?
२. मि.च्या दु.त मि. दि. - तों. पा. सु. - खि. पै. न. - म्ह. हा. मा. झ. घा. मि. प. व खा. ... हे आपणास (बलात्काराच्या तुलनेत का होईना, पण) अनाक्षेपार्ह (किंवा कमी आक्षेपार्ह) वाटते का?
एकंदरीत तुलना खटकली.
बलात्कारात तुम्हाला कोठेही विकृती, मनाचा विकार - आजार दिसून येत नाही हे
आश्चर्यच आहे!!
'बलात्कारात कोठेही विकृती अथवा मनाचा आजार अथवा विकार नाही' असा दावा (किमानपक्षी हजरहुजुरांपैकी) नेमका कोणी आणि कधी केला, हे जाणून घ्यायला आवडेल.
एरवी heterosexual असणारे पुरुष असा बलात्कार करतात. स्वतःची विकृती व्यक्त करतात.
या विधानाचा गर्भितार्थ नीटसा लक्षात आला नाही.
१. यात विकृती नेमकी कशात आहे असा आपला दावा आहे? १अ. असे बलात्कार केले जातात या बाबीत, की, १ब. हेटेरोसेक्शुअल पुरुष असा बलात्कार करतात या बाबीत?
२. याउलट, समजा असा (एखाद्या पुरुषावरील) बलात्कार एखाद्या होमोसेक्शुअल पुरुषाने केला, तर संबंधित बलात्कारकर्ता पुरुष 'स्वतःची विकृती व्यक्त करीत आहे' असा दावा आपण कराल का? २अ. (असा दावा आपण) केल्यास, अशा घटनेतील विकृती नेमकी कशात आहे असा आपला दावा असेल? २अ१. संबंधित बलात्कारकर्त्या पुरुषाने एक बलात्कार केला या बाबीत, की, २अ२. संबंधित बलात्कारकर्त्या पुरुषाने एका पुरूषावर बलात्कार केला या बाबीत, की, २अ३. संबंधित बलात्कारकर्ता पुरुष होमोसेक्शुअल आहे या बाबीत, की, २अ४. वरील २अ१ ते २अ३पैकी कोणत्याही दोन बाबींत (उपप्रश्न २अ४-१: यांपैकी नेमक्या कोणत्या दोन बाबींत?), की , २अ५. वरील २अ१ ते २अ३पैकी तीनही बाबींत? २ब. (असा दावा आपण) न केल्यास, का नाही?
३. वैयक्तिक अनुभव नाही, आणि खात्रीलायक विदाही हाती नाही (जो आहे, तो अनेक्डोटल आहे आणि एकंदर प्रमाणाची यत्किंचितही कल्पना देत नाही*), पण क्वचित्प्रसंगी स्त्रियाही पुरुषांवर बलात्कार करत असाव्यात अशी शंका आहे. (अर्थात, आधी म्हटल्याप्रमाणे, असे होत असल्यास, याचे तौलनिक प्रमाण माहीत नाही, पण तरीही, (पुन्हा: असे होत असल्यास) तौलनिक प्रमाणाने काहीही फरक पडतो असे वाटत नाही. शेवटी, विकृती ही विकृतीच.) याबद्दल आपले काय विचार आहेत?
एक लक्षात घ्या, वरीलपैकी कोणत्याही घटनेत विकृती ही अजिबात दडलेली नाही किंवा यांपैकी कोणत्याही घटनेत काहीही आक्षेपार्ह नाही असा माझा दावा मुळीच नाही. फक्त, यातील विकृती, यातील आक्षेपार्हता नेमकी कशात आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
लहान मुले (पुरुष), लहान मुली यांतून सुटत नाहीत.
अगदी मान्य. मात्र, यातही कोणत्याही एका लैंगिक गटाची मक्तेदारी आहे असे उपलब्ध त्रोटक विद्यावरून*** वाटत नाही.
बाकी चालू द्या.
तळटीपा:
* 'कथा' या चित्रपटातील 'तुम्हारे घर में बाप-भाई नहीं हैं क्या?' हे सुप्रसिद्ध वाक्य** अगदीच काल्पनिक (किंवा अगदीच अपवादात्मक परिस्थितीचे द्योतक) नसावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
** आम्हीही अधूनमधून चित्रपट वगैरे बघतो, म्हटले! (किंवा, आम्ही अधूनमधून चित्रपटही बघतो, म्हटले!)
*** 'शालेय शिक्षिका आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याशी संबंध ठेवून असल्याची घटना उघडकीस आल्याने संबंधित शिक्षिकेचे निलंबन, संबंधित शिक्षिकेस अटक आणि त्यानंतर तिच्यावर खटला चालून तिला शिक्षा' अशा प्रकारच्या बातम्या अमेरिकन वर्तमानपत्रांत - अगदी गंभीर, मेनस्ट्रीम वर्तमानपत्रांत - वाचनात आलेल्या आहेत. असे प्रकार अगदीच अपवादात्मक नाहीत, अमेरिकेसारख्या (तुलनेने एकंदरीतच मुक्त आणि त्यातही तुलनेने अधिक 'स्त्री-मुक्त' समाजव्यवस्था असणाऱ्या) देशांत तर मुळीच अपवादात्मक नाहीत, आणि भारतात / भारतीय समाजव्यवस्थेत जर असे प्रकार घडत नसतील किंवा घडत नाहीत असे वाटत असेल, तर याच्या संभाव्य कारणे म्हणून (१) भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीवर तुलनेने अधिक सामाजिक बंधने अथवा समाजाची करडी वगैरे नजर असल्याने स्त्रियांपैकी अशा प्रकारची विकृती असलेल्यांना असे काही करण्याची फारशी संधी उपलब्ध होण्याची विशेष शक्यता नसावी, आणि/किंवा (२) अशी प्रकरणे कदाचित उघडकीस येत नसावीत आणि/किंवा संबंधितांच्या संबंधितांकडून अथवा अन्य समाजघटकांकडून दडपून टाकण्यात येत असावीत, अशा काही शक्यतादेखील लक्षात येतात. (एक लक्षात घ्या, यात कोठेही स्त्रियांवरील सामाजिक बंधनांचे समर्थन अथवा मुक्त समाजव्यवस्थेला अथवा स्त्रीमुक्तीला विरोध यत्किंचितही नाही. फक्त, व्यक्ती या स्खलनशील (आणि म्हणूनच एखाद्या अविचाराला काय किंवा गैरकृत्याला काय, व्यक्ती म्हणून जबाबदार) असू शकतात, व्यक्तिगट नव्हेत, सबब जबाबदारीचे बोट संबंधित व्यक्तीकडे वळावे, आख्ख्या व्यक्तिगटाकडे नव्हे, एवढेच म्हणणे आहे - आणि इस्पिकला इस्पिक म्हणण्याचा अट्टाहास आहे - एवढेच.)