माझा चर्चेचा विषय व तिचा शेवटी बदललेला रोख वाचून नुकताच एक विरोप आला त्याची आठवण झाली
बेडकावर संशोधन करणारा संशोधक प्रथम बेडकाचा एक पाय तोडतो व त्याला उद्देशून म्हणतो "मार उडी " आणि बेडूक उडी मारतो. त्यानंतर दुसरा पाय तोडून संशोधक त्याला पुन्हा "उडी मार" म्हणतो . बेडूक दोन पायावर कशीबशी उडी मारतो. त्यानंतर तिसरा पाय तोडल्यावर संशोधक पुन्हा "उडी मार" म्हणतो तो बेडूक एका पायावर खुरडत उडी मारतो शेवटी संशोधक चौथा पाय तोडतो व बेडकास "उडी मार " म्हणतो त्यावेळी तो बेडूक उडी मारत नाही. शंशोधक त्याला पुन्हा पुन्हा "उडी मार " म्हणूनही तो अर्थातच उडी मारत नाही तेव्हां संशोधक आपले संशोधन पूर्ण झाले असे समजून निरीक्षणाचे सार काढतो " चार पाय तोडलेला बेडूक ऐकू शकत नाही "