असमाधान, घुसमट, मूळ वृत्ती, मोठेपणा सिद्ध करणे सगळ्याचा शेवट पुरुष स्त्रीवर सत्ता गाजवून पूर्ण करतो ही वस्तुस्थिती आहे.
आशा फॉर वुमेन या संस्थेच्या अहवालावर नजर टाकली तर अमेरिकेत राहणारे भारतीय पुरुष ( सगळे किमान पोस्ट ग्रॅज्युएट आहेत) आणि आपल्या पत्नीशी ते कसे वागतात याचे पुरावे देणाऱ्या डोमॅस्टिक व्हायोलंस च्या केसेस वाचता येतील. बलात्काराची आकडेवारी शोधणे, ती चघळणे , यात स्त्रीचाच दोष कसा हे ठरवणे फार सोपे आहे.. पण अशा स्त्रिया त्यानंतर कशा जगतात, कशा लढतात याचा विचार करून बघा...
@कुशाग्र
तुम्ही दिलेल्या उदाहरणावरुन/ निरोपावरून मी असा निष्कर्ष काढला
१ तो संशोधक- अर्थातच बिनडोक आहे
२. त्याने क्रूरपणा, सत्ता गाजवणे हे सर्व सिद्ध केले
३. तो बेडूक होता.. इथे सर्व प्रयोगात फक्त तो आहे..
-पुरुष पुरुषांवरही बलात्कार करू शकतात...
असो.. हा चर्चा प्रस्तावच खोडसाळ आहे. आता ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे
एक म्हणजे अशा प्रकारे बंदी
घालणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने योग्य आहे काय ?
नाही.
दुसरी गोष्ट
स्त्रियांच्या अशा कपडे वापरण्यामुळेच त्यांच्यावर बलात्कार होतो असे
म्हणता येईल का ?
नाही.
पण शेवटी एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आपल्या
व्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार करण्यासाठी आखूड कपडे किंवा स्लटसारखे कपडे
घालणे हा एकमेव पर्याय स्त्रियांना उपलब्ध आहे काय?
नाही.
व असे कपडे घालणे
स्त्रियांनाच एवढे आवश्यक का वाटते?
असे कपडे घालणे आवश्यक वाटते असे मुळीच नाही. व्यक्तीस्वातंत्र्य/ निषेध नोंदवण्याचा हा एक प्रकार ..
स्त्रियांवर पुरुषांकडून बलात्कार होतो - त्याकरता पुरुष जबाबदार असतो. स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणे हा पुरुषांचा गुणधर्म.. पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी हवे तसे वागणे, त्याचे समर्थन करणे हा पुरुषांचा धर्म..
नैसर्गिक - प्रकृतीवर संस्कृतीने मात केली नाही तर काय होईल? शेवट विकृतीत होणार.. बाई पाहिली की आम्ही उत्तेजीत होतो आणि मग काय हवे तसे वागतो हेच जर मूळ असेल तर मग बायकांचा पोषाख इत्यादी कांगावा कशाला? पुरुषांचे लक्ष वेधेल असे कपडे घालू नये हे माझे मत आहे . मला किंवा अनेक स्त्रियांना तसेच वाटते. पण त्याने फरक पडेल असे नाही.. कारण पुरुषांना ते नकोच आहे. असो. इथे चर्चा वा वाद घालून मला स्त्रीवर होणारा बलात्कार वाचवता येईल असे नाही.. त्यामुळे जाऊ द्या..