मीरा,
हा विषय मांडणे, त्यावर आलेले प्रतिसाद काहीच खोडसाळ वाटले नसतील तर मग प्रश्नच मिटला. एकाच गोष्टीकडे दोन व्यक्ती वेगळया पद्धतीने , वेगळ्या नजरेने पाहू शकतात असे समज, पण त्यात एक व्यक्ती चूक असते असेही नसते याचा विचार जरूर कर. आणि तो तू करशील अशी खात्री आहे.
इथे येणाऱ्या पुरुषाने असे विषय मांडण्याआधी आपल्या घरापुरता तो विषय संपवलेला असतो. आई/ मुलगी/ बहीण/ पत्नी अशा सर्वांना मी संरक्षक कवच देतो अशी भावना मनात घेऊन मग निव्वळ करमणूक करायला इथे असे विषय येत असतात. स्त्री मात्र तळमळीने त्यावरउपाय शोधते/ सांगते -
असे विषय मांडले की स्त्रिया अहमहमिकेने प्रतिसाद देतात. तळमळीने लिहितात. त्यात मग काही वाद होतात. पण मूळ विषय सुरू करणारा त्याविषयी सिरियस नसून केवळ गंमत बघा असण्याची शक्यता असते असे माझे निरिक्षण आहे. तसेच इतर अनेक जणही त्यात सामील होतात... किमान अशा संकेतस्थळावर तरी.
बायकांनी आडनाव बदलावे का, कपडे असे घालावे का, स्त्रियांना स्वयंपाक करता आलाच पाहिजे का? तुमच्यापेक्षा कमी पगाराचा नवरा चालेल का?.. काही उदाहरणे
अनेकदा त्यात स्त्रिया भावुक होऊन प्रतिसाद देतात, त्याची टर उडवली जाते.. कुशाग्र यांचा शेवटचा संशोधकाची गोष्ट सांगणारा प्रतिसाद त्याच धर्तीचा..
त्यामुळे अशा विषयावर मी मत देणेच टाळते... लोकांची करमणूक करायची असेल तर ती कशी करेन ते मी ठरवेन असा माझा पावित्रा असतो. आणि मदत करायचीच असेल तर स्वयंसेवी संस्था आहेत तिथे जाते.. अशा चर्चा करून काही होईल अशी आशा मी सोडली आहे.
मला सरसकटपणे सर्व पुरुषांवर कुठलाही दोषारोप करायचा नाही हे मी नमूद करते. स्त्रियांनी अशा विषयात आपण टवाळकीचा विषय होत नाही ना याचे भान राखून प्रतिसाद द्यावे आणि अन्यथा प्रतिसाद थांबवावे असे धोरण घ्यावे असे मला वाटते. ती वाचलेली उर्जा खरच काही घडवून आणू शकते याचा प्रत्यय मला आला आहे.