शब्दास जोडून कसेहि शब्द
झाली पहा सुंदर आगगाडी
दीर्घास सांगे तडजोड मंत्र
ह्रस्वांत काळा वर धूर काढी!
ताताजगागा असल्या क्रमाच्या
पट्ट्यावरी ती धडधाड जाई
सोपे नि साधे किति इंद्रवज्रा
आता कुणाला कळणार नाही?