अरुंधतीताई तुम्ही शब्दांचा कीस काढत आहात. जेव्हा कपडे अस्तित्वात नव्हते तेव्हा काय घडत होते हे एखाद्या इतिहास संशोधकालाच विचारावे लागेल. पण जर तुम्ही हे मान्य करता की स्त्री असणे हाच स्त्रीचा गुन्हा आहे, हे दुर्दैवाने खरे आहे. मग त्यात आणखी 'आ बैल मुझे मार' कशासाठी? इथे कोणीही पुरुषी वृत्तीचे उदात्तीकरण केलेले नाही. ६ महिन्याची मुलगी काही कोणाला आकर्षित करत नसते. तिथे माणसाची विकृतीच कारण असते. पण एकदा हे मान्य केले की त्याला आमंत्रण देणे हे चूकच आहे की नाही? कुशाग्र यांचा मुद्दा हा होता की असे कपडे वापरण्याची इच्छा मुलींनाच (स्त्रियांना) का होते? याचे कारण एकच आहे 'नको त्या बाबतीत पुरुषांची बरोबरी करण्याची हाव आणि अतिमॉडर्नपणा'. आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कमावते रात्री उशीरापर्यंत ऑफिसमध्ये काम करते, हे सर्व ठीक आहे. तरीही तिला काही सामाजिक बंधने पाळावीच लागतात. तशी ती पुरुषालाही असतातच पण तो त्याचा गैरफायदा  घेऊ शकतो.  शेवटी सुरी खरबुजावर पडली काय किंवा खरबूज सुरीवर परिणाम एकच.