प्रत्येक नाण्याला तीन बाजू तर असतातच असतात. एक तुमची बाजू , एक माझी बाजू आणि तिसरी " खरी " बाजू .पैकी दोन बाजू तुम्हाला लहानपणीच लक्ष्यात आल्या . तिसरी बाजू अमिताभ बच्चनने शोले मध्ये दाखून दिली . चौथी बाजू दाखवण्याचा जो आटापिटा आपण केलात तो पाहून हसावं कि रडावं हा प्रश्न पडला. हा सगळा खटाटोप करण्या पेक्षा , आपली सुरक्षा व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला असता तर किती छान झाल असत.ती सगळी खर्चिक आणि कुचकामी यंत्रणा उभी राही पर्यंत आपण गप्प राहिलात (आपण म्हणजे आपल्या सारखे बरेच) आणि आता लांबच्या लांब खर्डेघाशी करण्यात धन्यता मानता आहात आणि हि सगळी खर्डेघाशी वांझोटी आहे याची पूर्ण कल्पना असून..
आता तुमच्याच शब्दात म्हणायचं तर मला तरी लष्कराच्या भाजायची काय गरज ? तुमची नि माझी ओळख न पाळख पण .व्यवस्थे मधले नुसते दोष दाखवण्याच्या वृत्ती पेक्षा प्रत्यक्ष कामात रस घेणाऱ्यांची संख्या वाढावी हा माझा प्रयत्न आहे. माझा हा प्रतिसाद वाचून एकाच जरी मत परिवर्तन झाल तर माझ काम झाल्यासारखं आहे. आणि ती एफ व्यक्ती तुम्हीच असाल अशी मला आशा आहे. ( माधव परांजपे )