माझा निवडणूक सुधारणांचा प्रस्ताव "जनतेचा जाहीरनामा "   या प्रकारात मोडणारा आहे. या पूर्वी पण असे प्रयत्न  झालेले आहेत.पण जनतेच्या जाहीर नाम्यात कोणते मुद्दे असावे या वर मतभेद होणे स्वाभाविक असल्याने त्या प्रयत्नांना विशेष यश मिळालेले नाही . नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन "जनतेचा एक कलमी जाहीरनामा " हि कल्पना मला सुचलेली आहे . या कल्पनेचा सरळ  सरळ परिणाम  निवडणूक प्रक्रिया सुधारण्यात तर होईलच पण २०१४ नंतरची लोकसभा अधिक लोकाभिमुख असेल याची मला खात्री आहे.आणि याही पेक्षा अत्यंत महत्वाची बाब म्हणजे या जाहीरनाम्याला कुठूनही विरोध होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही आहे . उलट पक्षी सर्व राजकीय पक्ष , इच्छुक उमेदवार , प्रसार माध्यमे,हि कल्पना उचलून धरतील. निवडणूक सुधारणा विषयी आग्रही असणारे माननीय श्री  आण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी देखील या जाहीरनाम्याला सहमती दाखवतील ".व्यवस्थेत  राहून व्यवस्थेत बदल" घडवणारा हा प्रस्ताव असल्याने सरकार अथवा सरकार मधील शुक्राचार्य (वक्राचार्य )देखील  याला अडवू शकणार नाहीत . पण हा क्रांतिकारी प्रस्ताव नेमका आहे तरी काय ? २६ जानेवारी २०१२ पर्यंत कृपया प्रतीक्षा करा २०१४ च्या संग्रामाला अजून खूप अवकाश आहे मी फक्त २ महिने प्रतीक्षा करायची विनंती करार्त आहे . धन्यवाद