श्री चैतन्य दीक्षित,  आपण घेतलेल्या परिश्रमाबद्दल धन्यवाद.

'त्यामुळे दोन ओळी स्वतंत्र (किंबहुना,  प्रत्येक ओळ स्वतंत्र) म्हणायची झाल्यास,  चालीत म्हणणे सोपे ' असे आपण म्हणता.

पण असे  म्हणणे देखील, यमक नसल्याने ,आम्हाला नीटपणे जमलेले नाही. अशा वाचनाची एक लहान ध्वनिक्लिप करून तिचा दुवा येथे देता येईल कां?

'पण हे असे प्रत्येक ओळीशेवटचे आणि त्यापुढील ओळीच्या सुरुवातीच्या शब्दांचे अन्वय लक्षात घेऊन आणि ते निव्वळ वाचनातून
ऐकणाऱ्याला समजतील असे वाचणे अवघड आहे. ' हे तर आम्हाला मुळीच जमले नाही.

हे ही म्हणण्याची विशिष्ट पद्धत असल्याची नोंद माझ्या लेखात दिली आहे. त्या म्हणण्याच्या पद्धतीचा शोध मला घ्यायचा आहे.

सावरकरांच्या काळातील कोणी हयात आणि माहितगार व्यक्तिच याबाबत कांही सांगू शकतील. आपण यात रस घेतलात हे  निश्चितच  कौतुकास्पद आणि आशादायी आहे.