या चर्चेच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो की जीवनातल्या कोणत्याही प्रश्नाचा वस्तुनिष्ठ विचार करायचा असेल तर देहानी आपण कोण आहोत या दृष्टीकोनातून प्रश्नाकडे पाहणे पूर्वगृहित होते. आपल्या धारणा, (अनावश्यक) पूर्वानुभव, निव्वळ ऐकिव माहिती याचा निर्णयक्षमतेवर परिणाम होतो आणि बहुतेक वेळा निर्णय चुकतो, किमान निर्वैयक्तिक निर्णयाची मजा तर नक्कीच हुकते.

 >जेव्हा कपडे अस्तित्वात नव्हते तेव्हा काय घडत होते हे एखाद्या इतिहास संशोधकालाच विचारावे लागेल.

= हे इतकं अवघड नाहीये, वस्त्राचा प्रश्न माणसांपुरताच मर्यादित आहे, इतर सजीव सृष्टीत ते आकर्षण नैसर्गिकच आहे म्हणजे भूकेची जशी सायकल आहे तशीच पुनर्निमितीची सायकल आहे आणि त्याप्रमाणे ते देह कार्यरत आहेत.

माणसाचा प्रणय शारीरिक न राहता मानसिक झाल्यानी (प्रणयाचे बेसुमार विचारमंथन आणि कल्पना) ते आकर्षण अनैसर्गिक झालंय. हे जरा समजून घेण्यासारखं आहे. आपण भोजनासाठी भूक ही संवेदना प्रमाण मानण्याऐवजी वेळ ही कल्पना प्रमाण मानलीये त्यामुळे भूक अनिसर्गिक झालीये, निव्वळ होटेलचं किंवा पदार्थाचं नांव किंवा वर्णन ऐकून, जाहिरातीतली चित्रं बघून आपल्याला भूक लागू शकते.  

आता ही बहुतेक सर्वांचीच परिस्थिती असल्यानं वस्त्रांच्या बाबतीतही तसंच आहे त्यामुळे उत्तेजक वस्त्रं (अनैसर्गिक) आकर्षण निर्माण करतात आणि स्त्रीसाठी असुरक्षितता निर्माण करू शकतात.

> स्त्री असणे हाच स्त्रीचा गुन्हा आहे, हे दुर्दैवाने खरे आहे.....

= असा विचार मात्र करू नका कारण ती वस्तुस्थिती नाहीये, निव्वळ धारणा आहे आणि सद्य देहात बदल असंभव आहे त्यामुळे त्यातून व्यथित होण्यापलिकडे काही साधणार नाहीये. भिन्न देहांची निर्मिती नैसर्गिक आहे आणि आकर्षण पारस्परिक आहे, लाभलेल्या देहानुसार नैसर्गिक संवेदनंशी एकरूपता साधत जगण्यात आनंद  आहे.

संजय