या चर्चेतून मला काही मुद्दे सुचलेत आणि काही प्रश्नही पडलेत ते जरा स्पष्टपणेच लिहितो -
(१) साधारणपणे आपण बाहेर सार्वजनिक ठीकाणी (पुरुष असो की स्त्री) उकडत असले, गरम होत असले तरच आखूड कपडे घालतो. एरवी नाही. पण कडाक्याच्या थंडीत सुद्धा (देश कोणता का असेना!) (...शरीराचे भाग ...) उघडे ठेवण्यात स्त्रीयांचा हेतू आपले शरीर इतर पुरुषांना दिसावे हाच असतो, असे माझे ठाम मत आहे. पुरुष "त्या" नजरेने बघायला लागले की यांना आतून आनंद मिळतो. भले बाहेरून त्या तसे दाखवत नाहीत.
(२) भारतातल्या कामाला जाणाऱ्या स्त्रीया आणि कॉलेजला जाणाऱ्या मुली या घरातून निघतांना असे ( ... कपडे... ) घालत असतील तेव्हा त्यांचे सुजाण नवरे/आई/वडील/बहीण/भाऊ त्यांना अडवत/टोकत का नाहीत? की त्या त्यांचे ऐकत नाहीत? फॅशनच्या नावाखाली?
(३) मी याबाबत स्त्रीयांचा असा एक युक्तीवाद वाचला की, स्त्रीया आत्मविश्वासासाठी असे कपडे घालतात, पुरुषांना आकर्षीत करण्यासाठी नाहीत. माझे म्हणणे असे आहे की, ज्या मुख्य दोन गोष्टींमुळे पुरुष लैंगिक दृष्ट्या उत्तेजीत होतो फक्त त्याच नेमक्या अर्ध्या उघडे टाकून फिरण्यानेच काय फक्त स्त्रीयांना आत्मविश्वास येतो का? आणि असे कपडे घालणाऱ्या मुली/स्त्रीया यांना हे माहीती नसते का की, यामुळे पुरुष उत्तेजीत होतो?
(४) प्रतिक्रियांमध्ये एकाने मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे की, अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रीया टीव्हीत, पार्टीत किंवा प्रत्यक्ष पाहील्यावर आणि त्यामुळे उत्तेजीत झाल्यावर एखादा माणूस त्यांना काही करू शकला नाही, तरी त्यामुळे चाळवलेली भावना मनात धरून ती नंतर एखाद्या पूर्ण कपडे घातलेल्या स्त्रीवर व्यक्त होते. त्यामुळे असे कपडे घातल्याने काहीच परीणाम होत नाही असे होत नाही.
(५) शाळेत असे कपडे मुलींनी घातल्यास त्याचे परीणाम म्हणून मुलांचे लक्ष विचलीत तर होतेच ... एखाद्या घरात आईवडील इमाने इतबारे मुलांना उत्तेजीत करणाऱ्या सिनेमा, पुस्तक यापासून दूर ठेवत असले तरी शाळेत/रस्त्यावर प्रत्यक्ष एखाद्या मॉडेलहून सुंदर अशी स्त्री त्याने उत्तेजक कपड्यात पाहिली तर त्याचा भावना चाळवणार नाहीत तर काय? भारतीय संस्कृती या भावनेचे दमन शिकवते, आपण तसे मुलांवर संस्कार करतो पण भलेभले अजून काम उर्जेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत तेथे नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांचे काय?
(५) असे कपडे घातल्याने स्त्री पुरुषापासून मुक्त झाली असे तीला वाटत असेल तर ती सर्वात मोठी चूक! कारण, ते कपडे घालून शेवटी ती पुरुषांनाच आकर्षित करते. कल्पना करा, की अचानक या जगातून पुरुष नाहीसे झाले, तरीही मुली/स्त्रीया अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतील का?
(६) अंगप्रदर्शन करायची काहींना इतकी क्रेझ असते की घरून अगदीच बंधन असेल तरीही, काही मुली स्त्रीया आता स्लॅक्स घालू लागल्यात. काही जणी तर स्कीन कलर च्या स्लॅक्स घालतात, तसेच, अगदी त्वचेला चिकटणारा टी-शर्ट घालतात. हेही काही कमी उत्तेजक नसते. ... हे कटू आहे पण सत्य आहे.
(अनावश्यक वाटलेले काही तपशील वगळले : प्रशासक)