देह स्त्री असो की पुरूष, तुमची मानसिकता, तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, नेहमी निर्णायक असतो.
जर देहनुरूप धारणा सखोल रूजल्या तर जगण्यातली सहजता कमी होते कारण सर्व जीवन 'सहजीवन' आहे, अस्तित्व स्त्री आणि पुरूष असा भेद करत नाही, या धारणा माणसाच्या आहेत.
समजा, 'स्त्री असणे हाच स्त्रीचा गुन्हा आहे' या मानसिकतेतून कुणी जगायला लागलं तर अगदी जवळचे आप्तस्वकिय सोडता इतर सर्व आपल्या विरूद्ध आहेत असा गैरसमज होईल आणि पर्यायानं निम्म जगच वैरी वाटायला लागेल!
माझा स्वतःचा असा अनुभव आहे की देहभाव मध्ये न आणता प्रत्येक प्रसंगात, स्वतःशी प्रामाणिक राहून, 'काय सहज आणि सोयीच' होईल असा दृष्टीकोन ठेवला तर जगणं कमालीचं सोपं होतं, प्रसंग आनंदाचे होतात, मग तुम्हाला दोन्ही देहांच्या ज्या अस्तित्वागत क्षमता आहेत त्यांचा पुरेपूर उपयोग होतो.
संजय