मूळात तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. ह्या सगळ्या गोष्टीत मी पुढाकार घेण्याचे प्रयत्न वेळोवेळी करून बघीतले आहेत. हे घडण्या आधीच सांगून बघीतले. पण उपयोग झाला नाही. कारण गैर मराठी घरमालकांना एका मराठी भाडेकरूने हे दाखवून देणे पटले नाही. उलट चार दिवस पोलीसांनी मला त्रास दिला,  माझ्यावर शंका घेण्याचा पण प्रयत्न झाला. तसेच प्रश्न मला विचारले गेले. कारण पोलीसांचा देखील कोणाला तरी पूढे करून प्रमोशन मिळवण्याचा प्रयत्न असतोच हे विसरता येत नाही.  आता तर ठरवून टाकले आहे, कोणी खड्ड्यात  पडला असेल तर बाहेर काढण्यात हात देण्या ऐवजी "तीन माकडांचा" जयजयकार करत दुसऱ्या रस्त्याने निघून जाईन!!!! विनोद बाजूला ठेवा पण ह्या परिस्थीतीतून बऱ्याच वेळा गेलो आहे. नशीब माझे अजून काय!! मलाच त्रास सहन करावा लागला आहे. ह्याची उदाहरणे पुराव्या सहित भरपूर आहेत. पण उपयोग काय, कोणाला???