इलेक्ट्रॉन=विजक, ऋणक
प्रोटॉन=धनक
न्यूट्रॉन=विरक्तक
इलेक्ट्रॉनिक्स=विजकविद्या
हे शब्द प्रचलित मराठीत आढळून आले नाहीत. म्हणून नवे घडवले आहेत. त्यांचेबाबत मी समाधानी आहे.
त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया इथे मनोगतावरच झालेली आहे. दुवा सापडताच इथे देईन.
त्यांचेकरता ऋणाणू, धनाणू इत्यादी शब्दांची चर्चाही तेव्हा झाल्याचे आठवते.
मी वापरत असलेले पर्यायी शब्दस्त्रोत
१. मनोगताबरील सर्व पर्यायी शब्दविषयक चर्चा माझे संग्रही सुव्यवस्थित स्वरूपात राखली आहे.
२.मराठी शुद्धलेखन प्रदीप- मो. रा. वाळंबे, द्वितियावृत्ती-१९९३, मूल्य रु.३०/-फक्त
३. स्टुडंटस मॉडर्न डिक्शनरी, केशव भिकाजी ढवळे, ११ वे पुनर्मुद्रण १९९६, किंमत रु.१८०/-फक्त
४. मोल्सवर्थ डिक्शनरी.