मला कोणत्याच बाबतीत असुरक्षित वाटत नाही. कारण मी मानसशास्त्राची पदवीधर आहे. शिवाय गेली ११ वर्षे मी योगा करते. त्यामुळे यापूर्वी बरेच प्रसंग मी समर्थपणे निभावून नेले आहेत. पण अजुनही आजुबाजूला अनेक मुली अशा दिसतात की त्या छोट्या छोट्या प्रसंगाने हातपाय गाळून बसतात. त्यांना माझे हे सांगणे आहे की स्त्री ही झाशीची राणीही बनू शकते. स्त्री जन्माला आली म्हणून तिने स्वतःला कमी लेखू नये.