पुन्हा येथे तेच! पुरुषांशी प्रत्येक बाबतीत बरोबरी करण्याचा अट्टाहास!!!
अहो, पुरुष आणि स्त्री यांच्या शरिररचनेत आणि लैंगिकतेत नैसर्गिक फरक असतो.
कुशाग्र यांचे म्हणणे आनी प्रश्न बरोबर आहेत. त्यांच्या प्रश्नाला उगाच फाटा देवून भलतेच स्पष्टीकरण सगळेजण देत आहेत.
पुरुषांनी घरात/बाहेर बनियन न घालता जरी फिरले तरी एखादी स्त्री लगेच त्याकडे पाहून त्या पुरुषाशी लैंगिक दृष्टीकोनातून बघत नाही आणि त्यामुळे ती लगेच लैंगिकदृष्ट्या उत्तेजीत होणार नाही. स्त्रीला लैंगिकदृष्ट्या उत्तेजीत होण्यासाठी पेम, स्पर्श, प्रणय, समजून घेणे या गोष्टी आवश्यक असतात.
पुरुष लैंगिकदृष्ट्या उत्तेजीत होण्यासाठी त्याला स्त्री च्या नग्न शरीराकडे नुसते बघितले तरी चालते. मग ती स्त्री स्वतःची पत्नी असो, मासिकातली मॉडेल असो की पडद्यावरची अभिनेत्री!
स्त्री मात्र जर बनियन घालून फिरली तर त्यामुळे नक्कीच कोणाही पुरुषाची लैंगिक भावना चाळवल्याशिवाय राहाणार नाही. उगाच नैसर्गिक सत्य दुर्लक्षित करून नाही नाही ती तुलना पुरुषांशी कशाला करायची?
अजून मला एक समजत नाही की (सिनेमा, फॅशन, मॉडेलिंग हे क्षेत्र वगळता) मुलींनी लहानपणापासून ज्या सौंदर्यावर वर विविध प्रकारे मेहेनत घेतली, जपलं ते सौंदर्य असे रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला मोफत दाखवण्यात मुली, स्त्रीयांना काय मिळते कोणास ठाऊक?