बऱ्यापैकी टिकते. शिक्षणासाठी घरापासून दूरगेलेल्या चिरंजीवाने एकदा जुलै/ऑगस्ट महिन्यात घरचे लोणचे मागितले. घरी लोणचे नव्हतेच. मुंबईत कैऱ्या मिळाल्या नाहीत. पण मालाडला बाजारात ओली हळद बारा महिने मिळते. मग मी बनवले लोणचे.
१. लोणचे टिकावे म्हणून सोलणी, किसणी, सुरी, वापरायची ताटली, तगडे चमचे, गाळणे, बरणी वगैरे हत्यारे आणि भांडी  ओव्हनमध्ये कन्व्हेक्शन मोडमध्ये १३० अंश से. ला एक तास तापवून घेतली. हात तापवता आले नाहीत. साबणाने धूवून ड्रायरने कोरडे करून घेतले. ड्रायर चालवायला अर्थात दुसरी व्यक्ती लागली.
२. २५० ग्रॅम हळद स्वच्ह धुवून पुसून कोरडी केली. नंतर तासून साल काढली. 
३. लसणीचा एक कांदा: पाकळ्या सोलून घेतल्या.
४. साताठ इंच आले धुवून पुसून कोरडे करून मग तासून सोलून घेतले.
५. साताठ ओल्या मिरच्या धुवून पुसून कोरड्या करून घेतल्या.
६. सहा लिंबांचा रस काढून गाळून घेतला.
७. हळद आणि आले किसून घेतले. मिरच्या आणि लसूण बारीक चिरून घातली.
८. चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि भरपूर लाल तिखट घालून बरणीत घालून तगड्या चमच्याने ढवळून कालवले.
९. लिंबाचा रस घालून पुन्हा कालवले.
१०. तेल उकळवून थंड करून घातले.

फ्रीजमध्ये दोन अडीच महिने संपेपर्यंत टिकले. अजिबात चव बदलली नाही.  नंतर एकदा केलेले चांगले चार महिने टिकले पण संपून गेले. चव घेतलेला माणूस लोणचे नावाजतोच.