आपण घेतलेल्या या परिश्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद! आपण दिलेल्या दुव्यावर ते वाचन मी दोन तीन वेळा ऐकले. आणखीही ऐकीन.

दुसऱ्या कवितेला वाचनाची ही पद्धत वापरून पाहीन. तुम्ही वाचलेत तसे वाचन मला  कांही जमले नव्हते. आपल्या कविता वाचनाच्या पद्धतीने ऐकणाऱ्याला बऱ्यापैकी अर्थबोध होतोय असे मला वाटले. मी लेखात उल्लेख केलेल्या पद्धती सापडतील तेव्हां सापडतील, पण अर्थ कळू शकेल या पद्धतीने वाचन करता आले तरी ती या दिशेने एक प्रगतीच आहे असे समाधान या आपल्या प्रयत्नामुळे मला मिळाले. या प्रतिभावान महाकवीने मराठीला दिलेली ही देणगी आपण करंटेपणाने गमावू नये असे मला वाटते. महाविद्यालयांमधून मराठी शिकविणाऱ्या प्राध्यापकांनी खरे तर याचा शोध घ्यायला हवा.