मला एकदा बसमध्ये एक बाई म्हणाली की
संधी मिळाली तर अगदी ममाज बॉय असणारी बावळट मुले देखील आक्रमक बाये नर बनतात असा माझा अनुभव आहे. तेव्हा सुसंस्कृतता वगैरे गोष्टी मला सांगू नका.
लेखाच्या प्रश्नाला उत्तर देणे तेवढे सोपे नाही. रोज तंग कपडे घालणारी पण सभ्य महिला तशा कपड्यात सहजपणे वावरेल. तिची देहबोली बहुधा आव्हानात्मक नसेल. याउलट एखाद्या चहाटळ बदफैली वा त्या अर्थाने धंदेवाईक स्त्रीची देहबोली मात्र अंग झाकणारे अगदी पायघोळ कपडे घातल्यावरही आव्हानात्मक असेल. देहबोली हाही महत्वाचा घटक आहे. विशिष्ट परिसरातील रहिवाशांची संस्कृती हाही महत्त्वाचा घटक आहे.
तरी, शाळेत व ग्लॅमर वर्ल्ड वगळता त्या त्या परिसरातील संस्कृतीचे भान ठेवावेच लागेल. मूंबईच्या शिवाजी उद्यान परिसरातील बालमोहन शाळा वा पुण्यातील नूमवि इथे बहिष्कृत होईल अशी वेषभूषा मुंबईच्या एलफिन्स्टन वा सोफिया महाविद्यालयात सामान्य ठरू शकते.
तेव्हा त्या स्त्रीची देहबोली आणि परिसरातील अस्भ्यतेचे निकष ही परिमाणे वेषभूषेच्या मर्यादेला महत्वाचे निकष ठरावेत.