मी आजपर्यंत शेकडो सधन लोकांना विचारलंय तुमचा दिनक्रम काय असतो कारण मला हे कुतुहल होतं की पुरेस सांपत्तिक स्वास्थ्य लाभलं आणि मनमानी जगायच स्वातंत्र्य लाभल्यावर लोक ते कसं उपभोगतात. मला एकही माणूस छंद जोपासताना किंवा रोजचं जीवन रंगीत होईल असं काही करतांना दिसला नाही.
मला जेव्हा मोकळीक लाभली त्या वेळी माझ्या लक्षात आलं की नुसतं स्वातंत्र्य अनेकांना लाभू शकतं पण ते उपभोगणारा दुर्मिळ असतो. तुम्ही तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये जोपर्यंत एक छंद आणि एक खेळ आणत नाही तोपर्यंत तुमचा बौद्धिक विकास होत नाही. पंचेचाळीस नंतर तर जवळजवळ सगळे आता नवीन काही करण्याची शक्यताच उरली नाही असं जगतात. त्यातल्यात्यात हौशी ट्रेक किंवा ट्रिपा या पलिकडे काही करत नाहीत. स्वतःकडे नवं कौशल्य यावं, नवं काही शिकावं ही उमेदच मला हरवलेली दिसते.
मी हा लेख अशासाठी लिहिला की सामान्यातल्या सामान्याच्या जीवनात अभिव्यक्तीचे अंकुर फुटावेत, किमान एखादी कविता, निसर्गचित्रण, सुगम संगीत, वाद्यवादन, ललित लेखन, टेबल टेनीस सारखा एखादा खेळ, पोहोणं, नृत्य, रंग, गंध, रस याच्याशी संबंधीत काही तरी लोकांनी आत्मसात करावं जेणे करून अर्थार्जन आणि टिवी यापेक्षा वेगळं काही तरी त्यांच्या जीवनात घडेल.
मला हा प्रतिसाद इतक्या उशीरानी आल्याचं आश्चर्य आहे आणि त्याहीपेक्षा आश्चर्य याचं आहे की खरंच लोकांना अभिव्यक्तीचा आनंद मिळवण्यात रस नाहिये? तेच तेच रोजरोज जगून तुम्हाला कंटाळा येत नाही?
संजय