"अजून काही शक्य झाले तर ते करण्याचा जरूर प्रयत्न करेन.' या आश्वासनाबद्दल धन्यवाद.
ध्वनिमुद्रणातील आवाजावरून आपण तरूण असणार! तरूणांनी यात लक्ष घालणे दुर्लभ! ज्या कारागृहात ’वैनायक’ जन्मले तेथे कागद पेन्सिल मिळत नसे, आणि मुखोद्गत करून काव्य टिकविणे हाच पर्याय असे. अशा परिस्थितीत पठणाची चांगली पद्धत असल्याशिवाय पाठांतर होणे कठीणच. शिवाय हे पाठांतर कैद्यांपैकी इतर कोणाकडून करून घेण्यासाठी सावरकरांनी तशी पद्धत त्या कैद्यांना शिकविली असली पाहिजे. तेव्हा ती पद्धत काळाच्या ओघात नष्ट होणे दुःखदायक आहे. तो एक ऐतिहासिक ठेवा आहे. त्यात सावरकरांचे तेज आहे. निदान ध्वनिफितीच्या स्वरूपात त्याचे मुद्रण व्हावयास हवे. तसे कोणी करून ठेवलेही असेल किंवा ती पद्धत कोणाला माहीतही असेल. पण ते जिज्ञासूना उपलब्ध व्हायला हवे. त्यासाठी हा प्रयत्न!
मनोगत दिवाळी २०११ मध्ये ’प्रवास एका लेखाचा’ असा माझा लेख आला आहे. तो वाचावा ही विनंती. लेखात उल्लेख केलेले ई बुक विनामुल्य डाऊनलोड करून घेता येते.
मी सोलापूरचा! वय ७२. पण पुण्याला येणे होत असते. तेथे आल्यावर भांडारकर संस्थेत जाऊन येईन. कांही प्रगती झाल्यास ती माहिती येथे अवश्य देईन. ’ग्लोबल मरा्ठी’ आणि ’मायबोली’ वरही हे आवाहन मी केले होते. त्याला अद्याप तरी यश आलेले नाही. पण आपण दिलेल्या प्रतिसादामुळे मला कधी ना कधी मूळ वाचन पद्धत मिळेल असे वाटू लागले आहे. धन्यवाद!