सुधीरजी, तुमची संतुलित आणि वास्तवाला धरून असलेली प्रतिक्रिया आवडली. याच नाण्याची दुसरी बाजू -
देहबोली इतकेच नजरेतले भावही बोलके असतात. स्त्रियाही 'वाईट नजरेचे पुरूष' नेमके ओळखतात. सूचक दृष्टीक्षेप टाकणे/ एकटक न्याहाळणे/ चोरटे कटाक्ष टाकणे/ अंगचटीला जाणे/ शीळ घालण्याचे नानाविध आणि कौशल्यपूर्ण प्रकार इ. बद्दलचे असभ्यतेचे निकषही स्थळ, काळ, परिस्थितीप्रमाणे थोडेफार बदलत असावेत असे एक सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्यामुळे यथायोग्य भान ठेऊन समाजात वावर असावा हा सल्ला उभयपक्षी लागू व्हायला हरकत नसावी.
पुरूषी मानसिकतेविषयीच्या चिंता/ सात्त्विक संतापातून असाच एखादा धागा काढला तर स्त्रिया आपसूकच न्यायाधीशाच्या खुर्चीत विराजमान होऊन या विकृत मानसिकतेतून पुरूष कसे सहज बाहेर पडू शकतील या विषयीची एक से एक अधिकारिक (आणि व्यावकारिक दृष्ट्या तितकीच निरूपयोगी) वक्तव्ये देतील. अशीच एखादी प्रतिसादसमृद्ध चर्चा होईल. थोडाफार वैचारिक 'स्लटवॉक' तसाही घडून येईलच. असो.