आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार . आपण म्हणता ते मराठी शब्द मला वापरता आले असते. एक तर तसा
मी विचारच केला नाही. आणि दुसरं म्हणजे, ऑफिसमध्ये (म्हणजे कार्यालयात) इंग्रजी शब्द किंवा प्रचलित पण चुकीचे शब्द,                                         जे नकळत तोंडात बसलेले आहेत, ते सुद्धा वापरले जातात, म्हणजे मराठी शब्द न  वापरणं याचं हे स्पष्टीकरण होऊ शकत नाही. केवळ एक ऑफिशियल वातावरण (कार्यालयीन वातावरण. वातावरणाला हल्ली  वापरात असलेला शब्द म्हणजे  माहोल) वाटावं यासाठी  सदरहू इंग्रजी शब्द वापरले आहेत. असो. तरीसुद्धा आपलं म्हणणं बरोबर वाटलं. कृपया समजून घ्यावे.