>मला वाटतं की जेव्हा ज्याला हे लक्षात येतं कि आपण रोज रोज तेच जगतोय, आणि कशासाठी एव्हढं सगळ? मला माझ्या मनाप्रमाणे केव्हा जगता येणार?.. तेव्हाच रुटीन मधून बाहेर कसं पडावं याचा विचार सुरू होतो. काहींना हे लक्षात आलं तरी नवीन काही करावं असा उत्साह वाटत नाही. (मीच)

काही जण रुटीन बरोबर छंद ही जोपासून राहतातच, दे आर एबल टु बॅलंस अँड एंजॉय बोथ द वर्क अँड द क्रिएटीव फ्रिडम. असंही असेल की काहींना हे लक्षात येतं पण त्यानी ते जणू accept केलेलं असतं की आता असंच सगळं पुढचं तर काही जणांना ज्याला आपण रुटीन म्हणतो, तेच आवडत असेल तर?

= उन्मेश, हा भुलावा आहे. स्वछंद माणसाची अत्यंतिक अभिप्सा आहे. परवा मी मलिका शेखचं आत्मनिवेदन वाचत होतं (ॠतुरंगचा दिवाळी अंक), ती म्हणते प्रेमापेक्षा स्वातंत्र्य मोठंय आणि तिचं म्हणणंय की एखाद्या माणसावर आपण प्रेम अशासाठी करतो की तो आपल्याला स्वातंत्र्य बहाल करतो! मुद्दा असाये की स्वातंत्र्य ही माणसाची फार मोठी आंतरिक इच्छा आहे. रूटीन आवडत म्हणण हा लपवलेला नाईलाज आहे.

उत्साह वाटायला दोनच गोष्टी लागतात : एक, तुमचं तुम्ही करत असलेल्या कामातलं कौशल्य (त्यामुळे तुम्ही कामत आनंद निर्माण करू शकता) आणि दोन, व्यायाम, ज्यामुळे तुमचं शरीरस्वास्थ्य उत्तम राहतं.

पाश्चिमात्यांची जी काही ऐहिक प्रगती झालीये तीला या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत. कामाला ते दर्जा देत नाहीत, तिथला सिक्योरिटी गार्ड असो की स्विपर आपलं काम अत्यंत इमानदारीनी करतात आणि शरीरस्वास्थ्याच्या बाबतीत ते दक्ष असतात. हे वातावरण भारतात निर्माण झालं पाहिजे. समरसून काम आणि मन लावून केलेला व्यायम यामुळे उप्तादनाचा दर्जा, कामाच्या ठिकाणच वातावरण, कामातून मिळणारा आनंद सर्वच वरची पातळी गाठतात.

हे एकदा साधलं की मग उर्वरित वेळात छंद पुरवता येतात, ते पुरवण्यासाठी उत्साह राहतो.

एकदा हे असंच चलायच म्हटल्यावर कसा चेंज होणार तुमच्या दिवसाचा पॅटर्न? आणि इतकी साधी गोष्टंय की जोपर्यंत तुमच्या दिवसाचा पॅटर्न बदलत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलत नाही!

आणि ते विशियस सर्कल आहे पॅटर्न बदलत नाही म्हणून उत्साह वाटत नाही आणि उत्साह वाटत नाही म्हणून पॅटर्न बदलत नाही!

>> मला जेव्हा मोकळीक लाभली त्या वेळी माझ्या लक्षात आलं की नुसतं स्वातंत्र्य अनेकांना लाभू शकतं पण ते उपभोगणारा दुर्मिळ असतो.. पटलंय.

= पटायचाच अवकाश आहे मग बदल घडायला सुरूवात होते! आणि तोच तर या लेखाचा हेतू आहे.

संजय