मी ही कादंबरी वाचली नाही किंवा चित्रपटही बघितला नाही. ( दोन्ही करायला आवडेल ) पण यावरून स्टार प्रवाह वरची एक मालिका आठवली. जी नुकतीच सुरू झाली आहे. ' दोन किनारे दोघी आपण ' यातही दोन कुटुंबं आहेत. एक सोमलवार आणि एक प्रधान. आता या सोमलवारांच्या घरात जी सासू आहे ती टिपिकल सासू आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तरीही सुनेला दोन मुली झाल्यावर तिने पुढच्या दोन वेळा तिचा गर्भपात करवला आहे. तिसऱ्या वेळी तिला ऍडमिट केल्यावर ती आपल्या विहिणीला स्पष्ट सांगते की आता जर तुमच्या मुलीला तिसरी मुलगी झाली तर तिला आमच्या घरात प्रवेश नाही. नशीबाने तिला परत मुलगीच होते. आता सुनेची आई टेन्शन मधे. मुलगी शुद्धीवर यायच्या आधीच काहीतरी करायला हवे या प्रयत्नात तिला तिथेच एक मूल (प्रधानांचे)जोरदार रडताना दिसते. ती नर्सला विचारते. नर्स सांगते की या बाईंना त्यांच्या प्रियकराने फसवले आहे. त्यामुळे त्या मूल स्वीकारायला तयार नाहीत. त्यांना माहितही नाही की मुलगा झालाय की मुलगी. मग ही आई आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी त्याच नर्सला हाताशी धरून मुलांची अदलाबदल करते. सोमलवारांच्या घरात आनंदीआनंद होतो. बाकी सांगत बसत नाही. पण आता १८ वर्षं उलटली आहेत. आणि आता सगळ्यांना सत्य कळले आहे. आता पुन्हा त्या मुलांची अदलबदल आपापल्या आयांकडे केली आहे. आता मला सांगा जन्मापासून १८ वर्षं या मुलांनी जिला आपली आई मानले ती मुले आता अचानक दुसऱ्या बाईला आपली आई म्हणून कशी स्वीकारतील? प्रेम फक्त जन्म दिल्याने मिळत नाही तर ते सहवासाने निर्माण होते हे यांना कोणी सांगायचे? साधी कल्पना करा की आपण ज्या मुलाला आपले म्हणून वाढवले आहे त्याच्यावर जर १७/ १८ वर्षांनी कोणी दुसरेच हक्क सांगेल तर त्या आईची अवस्था काय होईल? अगदी कोणी डीएनए टेस्ट करून पुरावा दिला तरी यात मनाचा, प्रेमाचा आपलेपणाचा काहीतरी भाग असेलच की नाही? मला तरी या गोष्टी पटत नाहीत.