अशा विषयावरची उत्कृष्ट लेखमाला. तीही खोलवरच्या तांत्रिक तपशिलासह. हाही भाग आवडला.
संसर्ग हा शब्द infection साठी नेहमी प्रचारात आहे. तरीही तो exposure च्या या संदर्भातल्या अर्थासाठी चपखल बसतो.
अल्फा कण बीटा कण ही विशेषनामे आपण तशीच ठेवली हे आवडले.
निर्धारणाक्षम हा देखील शब्द चपखल बसतो, आवडला.
बक्कल हा शब्दाचा वापर तर लाजबाब.
एखाद्या लेखाला नावे ठेवण्यास कष्ट घ्यावे लागत नाहीत. तो लिहायला अपार कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव मला आहे. तरी काही तपशील न पटणारे असले तर लेखकास दाखवणे ही माझी भूमिका आहे. या न पटणाऱ्या तपशिलांना मी न्यून किंवा उणीव म्हणत नाही हे कृपया ध्यानात घ्यावे. आणखी मला जे पटले नाही ते चुकीचे आहे आणि माझेच बरोबर असे देखील मला म्हणायचे नाही. तरी न पटलेले शब्द पुढे देत आहे.
फीत हा शब्द लवचिक अशी लांब पट्टी या अर्थाने वापरला जातो. इथल्या संदर्भात आपल्याला पातळ आवरण किंवा कवच यासारख्या अर्थाने अभिप्रेत असावा असे मला वाटते. त्यामुळे फीत हा शब्द पटला नाही. परंतु लांब पट्टी = रिबन या अर्थाने वापरला असेल तर तो पटण्यासारखा आहे.
सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.