'क्षणाचा सोबती' यांची प्रतिक्रिया लक्षणीय वाटली. स्त्री-पुरुषांच्या लैंगिकतेत आणि मानसिकतेत फरक असतो. अल्पवस्त्रावृता ललनांना पाहून मन विचलित होणे हे बहुतेक पुरुषांच्या बाबतीत नैसर्गिक असावे. अर्थात त्याचे पर्यवसान हे कोणत्याही वाईट कृतीत होणे वा न होणे हे त्या त्या व्यक्तीवरील संस्कारांवर अवलंबून असणार. बऱ्याचशा पुरुषांच्या बाबतीत वाईट कृती न घडण्याचीच जास्त संभावना असावी. पण मुळात सार्वजनिक ठिकाणी असे मन विचलित करू शकणारे पोषाख नसलेलेच बरे, नाही का?

वनवासी जमातीत उत्तरीय नसणे हे आजही असेल. पण ते तसे तेथील सर्वच स्त्रियांच्या बाबतीत असल्याने एखाद्या स्त्री ला पाहून एखादा वा अनेक पुरुष विचलित न होणे हे सहज होत असेल. आजच्या समाजातही सर्वच स्त्रियांचा पोषाख तसा असला तर त्यावर प्रतिक्रिया वा चर्चा होणार नाहीत. त्या विशेष किंवा वेगळ्या उठून दिसणार नाहीत. आणि हे प्रश्नही निर्माण होणार नाहीत.

 ही चर्चा वाचायला मी आज सुरवात केली. मला आजपर्यंतच्या सर्व प्रतिक्रिया आधी वाचायच्या होत्या. पण फक्त पहिल्या १७ प्रतिक्रियाच पाहता आल्या. पुढच्या प्रतिक्रिया उघडायचा प्रयत्न केला की 'प्रतिक्रिया उपलब्ध नाही' असा संदेश येतो आहे. याबाबत कोणी जाणकार मदत करू शकतील का?     

-- मुकुंद.