खालील नकाशा पाहिल्यास भारताने जी कंत्राटे घेतली आहेत ती चीनपासून खूपच दूर आहेत हे दिसून येईल. ब्रिटिश पेट्रोलियमशी ४५ टक्के भागीदारी असलेला ONGC-Videsh चा ०६-१ नंबरचा ब्लॉक होचीमीन शहराच्या पार आग्नेय दिशेला आहे, पूर्णपणे ONGC-Videshचे १२७ आणि १२८ नंबरचे ब्लॉक्स होचीमीन शहराच्या पूर्व दिशेला आहेत तर एस्सारने घेतलेला ११४ नंबरचा ब्लॉक मध्य व्हिएतनाममधील दानांग या शहराच्या पूर्वेला आहे व ही सारी क्षेत्रे चीनच्या आसपासही नाहींत. पण कुठल्याशा जुन्या ऐतिहासिक गोष्टींच्या आधारे 9-dot line मारून तिथे आपला मालकी हक्क चीन मांडत आहे. अशाच युक्तिवादाच्या आधाराने चीनने सध्या तावांग, अरुणाचल प्रदेश वगैरे आपल्या प्रांतांवरही हक्क सांगितला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नाविक सीमेबाबतचा करारही चीनला मान्य नाहीं.
थोडक्यात काय तर चीनचा "बळी तो कान पिळी"चा प्रयोग हाऊसफुल्ल गर्दीत चालू आहे!
नकाशाचे जास्त मोठे विस्तारण करून पहा.