कांदळकर साहेब, नमस्कार,
आपल्या ह्या प्रतिसादामुळे लिहीण्याची उमेद निस्संशय वाढली आहे. त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!
एरव्ही सखोल तांत्रिक लेखांना मुळात वाचक कमी. त्यातून नवे शब्द घडवण्याबाबत प्रचलित असलेली सार्वत्रिक चीड. यामुळे मिळणाऱ्या प्रतिसादांतून नाउमेद करणारे प्रतिसादच हाती लागतात.
वास्तविक मराठीत अशा प्रयत्नांना बळ देण्याची गरज असतांना, वाचकांचा कल मात्र दुर्लक्ष आणि फारच झाले तर कुचेष्ठा करण्याचा आहे ही दुःखद परिस्थिती आहे. मला स्वतःस मात्र मी करत असलेल्या प्रयत्नांचे अपार महत्त्व पटलेले आहे. म्हणून जाणीवपूर्वक पत्करलेला हा मार्ग मी सहजी सोडू नये असेच मला वाटते आहे.