मुकुंदजी तुमची प्रतिक्रिया बरोबर आहे. आपण जेव्हा प्रथम शर्ट-पँट घातलेली मुलगी बघितली असेल तेव्हाही आपल्या भुवया वर गेल्याच असतील. पण आता काही वाटत नाही. तसेच ज्या कोणत्या जमातीत कपडे वापरत नसतील त्या समाजातल्या लोकांना त्याचीच सवय असेल. त्यामुळे काही विपरित घडत नसेलही. पण म्हणून कुठेही 'तसेच' राहून चालणार नाही.