हाच प्रश्न सच्च्या गुरूच्याही बाबतीत पडतो. साधूंच्या, बाबांच्या, दादांच्या, बुवा-महाराजांच्या गर्दीत खरा गुरू, खरा संत कसा ओळखावा? आपली मोजपट्टी फार तोकडी असते. आणि त्यांना ओळखणारे आपण तरी कोण? संतांच्या बाबतीत 'मी त्यांना ओळखलंय बरं का', असं म्हणण्याचं धारिष्ट्य आपण कसं करणार? कधीतरी तेच आपली ओळख पटवतात. वरच्या गोष्टीतल्या म्हाताऱ्याने पटवली तशी.
देव गर्दीतही नाही आणि गर्भगृहातही नाही. मग तो आहे तरी कुठे? तर तो आपल्या स्वतःतच आहे. आपल्यातल्या ईश्वरी तत्त्वाला प्रकट करणं, त्याचा विकास करणं हेच आपलं विहित कार्य.
असो. या विषयामधलं चर्चेचं 'पोटेन्शिअल', स्थितिजन्य शक्ती खूप मोठी आहे. मुळात देव आहे की नाही यावरच लाखो शब्द लिहिले बोलले गेले आहेत. तेव्हा अधिक फाटे फुटण्याआधी थांबलेलं बरं.