भाषकाका, हे सगळे निवासी मुंबई-पुणे-ठाणेकर मनोगती आता दुसऱ्यांदा भेटतील. आपल्या अमेरिकन कट्ट्याचे काय हो? आपणसुद्धा भेटू या की एकदा.
सहलीला जाणाऱ्या मनोगतींनो, खूप खूप मज्जा करा तिकडे. न चुकता आमची आठवण काढा. भरपूर छायाचित्रेदेखील काढा, आम्ही ती बघूनच समाधान मानू..
आणि हो, आमच्यासारख्या परदेशस्थित मनोगतींसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एखादी सहल ठरवा, नक्की? बरेच लोक तेव्हा सुट्ट्या असल्यामुळे भारतात येतात. (आमचे डिसेंबरचे नक्की नाही पण अजून )
~ मैथिली