सांप्रतकाळी ऐश्वर्यापुराणास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातूनही विशेषतः सोळा तारीख अतिमहत्त्वाची ठरली आहे. तर त्या अंकासंबंधीसुद्धा माहिती येऊ द्या म्हणजे लोकांना नवी व्रते, नेम करायला बरे पडेल. किती दिवस तीच तीच सोळा सोमवार टाईप व्रते करीत राहायची? जुन्या रूढी मोडायला नकोत का?