माझ्या अमेरिकन कट्ट्याच्या प्रस्तावाला ५-६ प्रतिसाद आले. आपण फारच लांब राहतो त्यामुळे असे पटकन भेटणे (मुंबई-पुण्यासारखे) जमणे कठीण वाटते.
इथे (ऑरेगन मध्ये पोर्टलंडला) २४-२५ सप्टेंबरला rec.music.indian.misc या न्यूजग्रूपतर्फे एक मेळावा होणार आहे. त्याला मी जाईन (आमच्या परसातच आहे म्हणा ना) त्या वेळेला कोणी जमले तर उत्तम होईल.
मैथिली यांना येणे शक्य होईल असे वाटते. सान-डि ऍगो पासून सहज शक्य आहे. रोहिणी विनायक तेव्हा आले तर आपला इथे छोटेखानी कट्टा करू या.
मध्यंतरी आणखी कोणी मनोगती पोर्टलंडला आहे असे वाचल्याचे स्मरते, पण कोण ते आठवत नाही.
कलोअ,
सुभाष