लिखाणात तत्कालीन संदर्भ किती प्रमाणात येतात आणि ते लक्षात न आल्यास लिखाणाच्या एकंदर परिणामकारकतेत कितपत उणीव येते यावर ते मनाची कितपत पकड घेईल हे ठरत असावे. काळाच्या ओघात असे कित्येक संदर्भ (उदा. संगीत नाटके, चाळवजा वस्तीतले साचेबद्ध राहणीमान इ. ) पुसट झाल्याने ते प्रत्यक्ष अनुभवता न आलेल्या नव्या पिढीच्या मनाची पकड 'जुने' साहित्य घेऊ शकत नाही. हे स्थित्यंतर होताना आपणही जर जुन्याच काळात मनाने रमणे सोडून दिले असेल बरेचसे साहित्य पूर्वीइतकी मनाची पकड घेत नाही. मलाही तसा अनुभव नेहेमी येतो.