मी कुशाग्र यांच्याशी सहमत आहे. जेव्हा मुंबई दूरदर्शन नव्याने सुरू झाले तेव्हा त्यावर ' चिमणराव' बघितले आहेत. दिलीप प्रभावळकरांचा अभिनय आणि त्यांना बाळ कर्वे यांनी तितक्याच उत्कटतेने दिलेली साथ हा या मालिकेचा जीव होता. दिलीप प्रभावळकरांचे स्पष्ट शब्दोच्चार ही एक त्याची जमेची बाजू होती. टिपिकल किनरा आवाज आणि योग्य ठिकाणी घेतलेले पॉझ, हास्याचे फवारे उडवत असत. पण मी जेव्हा चि. वि. जोशांचे  पुस्तक वाचले तेव्हा तितकी मजा आली नाही. उलट पु. ल. देशपांडे वाचताना जास्त हसू येते आणि त्यांचे काही एकपात्री प्रयोग बघताना ती मजा येत नाही. कारण त्यांचे उच्चार तोंडातल्या तोंडात वाटतात. पण म्हणून ते कालबाह्य झालेले मात्र नाहीत. अजूनही त्यांची पुस्तके एव्हरग्रीन आहेतच.