हे पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहा.
'दृष्यकथा' हा पुस्तकाच्या नावाचा भाग असल्यास
'ही शुद्धलेखनाची चूक नसून ... पुस्तकाला नाव देताना विशेषनाम म्हणून दृष्य... असे मुद्दाम काही उद्देशाने दिलेले आहे.' असा युक्तिवाद एखाद्याला करता येण्यासारखा असल्याने त्या दृष्टीने त्याकडे पाहायला हवे असे समजणे उचित होईल.
तुमच्या लेखात पुस्तकाचे संपूर्ण नाव तसे आहे असा उल्लेख असता तर हे वेळीच लक्षात आले असते. तुम्ही लेखाला शीर्षक देताना मन्वंतर : ... असे दिलेले आहे त्यामुळे मन्वंतर एवढेच विशेषनाम आणि पुढे लेखकाचे (म्हणजे तुमचे) शब्द आहेत असे वाटत आहे. तुम्ही चिकटवलेल्या चित्रात पुस्तकाचे 'मन्वंतर एक दृष्यकथा : जोशी की कांबळे' असे विशेषनाम दिसत आहे.
पुस्तकाला नाव देताना लेखक/प्रकाशकांनी अज्ञानाने किंवा तपासणीच्या हलगर्जीपणाने असे नाव न देता काही विशेष उद्देशाने दिलेले आहे असे म्हणावेसे वाटते. एरवी दृश्य असेच लिहायला हवे होते, असे वाटते.
तुमचा आक्षेप दृष्यकथेमधल्या 'ष्'य वर दिसतोय.
तुमच्या लेखनात तेवढी एकच चूक होती अशी समजूत होत असल्यास ती योग्य नाही.
आग्रह योग्य पण अति अट्टाहास धरू नये
शुद्धलेखनाच्या बाबतीत हलगर्जीपणा करण्याचा, प्रसंगी त्याचे समर्थन करण्याच्या प्रयत्नांचा प्रतिकार म्हणून नव्हे तर निर्दोष मराठी लेखनविषयक एक धोरण आणि भूमिका म्हणून प्रशासन शुद्धलेखनाचा नुसता आग्रहच धरील असे नव्हे तर त्यासाठी सुविधा घडवून त्यात वेळोवेळी सुधारणा करून ती सर्वांना उपलब्ध करून देणे, प्रसंगी उपलब्ध वेळेनुसार शुद्धलेखन सुधारणेत योगदान देणे, इत्यादी कामे आवर्जून करीत राहील.
आणि एक ... तो शब्द 'अट्टहास' असा आहे, असे दिसते. येथे पाहावे.हे शब्द असे लिहा (अं - अ)
प्रशासनाच्या शुद्धलेखनविषयक धोरणात आणि वाटचालीत तुम्ही दाखवत असलेल्या स्वारस्याबद्दल धन्यवाद.