शासकीय शब्दकोशाद्वारे 'खीच्चे'चे मूळ स्पष्ट झाले आहेच. या निमित्त्ताने मराठी शब्दरत्नाकर उघडून पाहिला तेव्हा बरेच आजूबाजूचे शब्द सापडले. त्यांचा सर्वांचा शिजवलेल्या तांदुळाच्या मऊचिकट स्थितीशी थोडाफार संबंध आहे. उदा. खिव, खिवट, खिवटें, (यावरूनच खिमट, खिमटे हे शब्द आले असतील का?)खीच, खिचा, खिचडी, खिचडा इत्यादि.   खिची म्ह. दाटी असाही एक अर्थ दिसला.
गिच्चगोळा या शब्दातला गिच्च सुद्धा याच खिच वरून आला असावा का? आणि नंतर गिचमिड?