पु. लं. च्या एकपात्री प्रयोगांचे चित्रीकरण झाले त्या काळात विडिओ चित्रणाचे तंत्र फारसे प्रगत झालेले नव्हते. त्यामुळे या चित्रणातील छायालेखन आणि ध्वनिमुद्रण या दोहोंचा दर्जा फारसा चांगला राखता आलेला नाही. 'आहे मनोहर परी'मध्ये सुनीताबाईंनी या संबंधीची हकीगत लिहून ठेवली आहे.शिवाय एकपात्री प्रयोग नेपथ्यविरहित आणि इतर पात्रांच्या अनुपस्थितीत  असा टी. व्ही च्या पडद्यावर पाहाताना एकसुरी वाटतोच. त्याचे कारण तो विनोद कालबाह्य झालाय हे मुळीच नाही.