पु. लं. च्या एकपात्री प्रयोगांचे चित्रीकरण झाले त्या काळात विडिओ चित्रणाचे तंत्र फारसे प्रगत झालेले नव्हते. त्यामुळे या चित्रणातील छायालेखन आणि ध्वनिमुद्रण या दोहोंचा दर्जा फारसा चांगला राखता आलेला नाही.

आजच्या मानाने तंत्र फारसे प्रगत नव्हते हे खरे असले तरी "बटाट्याची चाळ"ची सीडी पाहताना वाटते तितके वाईटही नव्हते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या सुनीताबाईंवरील एका पुस्तकात असे म्हटले आहे की त्यांचा पु̮̮.लं.च्या लोकप्रिय कार्यक्रमांच्या ध्वनीचित्रमुद्रणाला तीव्र विरोध होता. जोरात चाललेल्या ह्या कार्यक्रमांच्या तिकीटविक्रीवर त्याचा विपरीत परिणाम होईल अशी म्हणे त्यांना सुप्त भीती वाटत होती. अर्थात, स्वभावानुसार, तसे उघड न सांगता त्यांनी ह्या विरोधाला काही वेगळीच, कलाकारांना त्रास होईल इत्यादी थातुरमातुर कारणे दिली. ह्यामुळेच 'बटाट्याची चाळ' चे एकदाच, एकाच जागीच स्थिर ठेवलेल्या एकमेव कॅमेऱ्याने  रटाळ असे चित्रण कसेबसे केले गेले. तेच आज आपल्याला सीडीच्या स्वरूपात उपलब्ध आहे.