मिलिंदजी,
अतिशय खोल आशय असलेली  रचना. दोन तीन वेळेस वाचली . प्रत्येक वेळेस नवीन पदर उलगडत गेले.
वृत्त? होते काल-परवापर्यंत
अंगभर घट्ट लपेटलेले.
फारच काकू-छाप दिसू लागले
तसे फेडून टाकले.
आता उरली आहे अंगावर
लयीची टिचभर बिकिनी.
तीही उतरणे जमेल हळूहळू
आशयाच्या आरस्पानी आविष्कारासाठी. >> सगळीच रचना मस्त पण या ओळी पार भिडल्या.
अवांतरः- मनात एक शंकेची पाल चुकचुकतेय. गजल लेखणास पूर्णविराम द्यायचा विचार तर नाही ना?