"ग"ची बाधा
प्रे. अतुल सोनक (मंगळ., २२/११/२०११ - २०:२४).
आशाबाईंचं एक तर वय झालंय, इतके वर्षं गाणी म्हटल्यानंतर आणि भरपूर मानमरातब मिळाल्यानंतर "ग" ची बाधा होणं साहजिक आहे. काळ बदलत असतो, हे यांना एक तर कळत नाही किंवा कळत असूनही आपणच कसे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, हे दाखवण्यासाठी अशी तुसडया वृत्तीची विधानं असले लोक करतात. हिमेश रेशमिया कोणाला आवडो न आवडो, त्याची पहिली ओळीने ३६ गाणी सुपरहिट झालीत. आशाबाईंची झाली होती का? कोणाला कमी लेखून स्वत:ला मोठेपणा मिळत नाही, हे अशा लोकांना ठणकावून सांगायला हवं. ते काम अर्चनाजी आपण केलंत, त्याबद्दल धन्यवाद.