अर्चना,
आशाताईंची व्यथा समजायला तुम्हाला जुनी गाणी नुसती 'ऐकलीयेत' म्हणून चालणार नाही त्या गाण्यांचा अभ्यास करायला हवा.
मध्ये मी शंतनू मोईत्राशी (थ्री इडिएटस आणि परिणिताचा संगीतकार) व्यक्तीश: बोललो. तो म्हणाला पूर्वीप्रमाणे जर लिरिस्ट, डिरेक्टर, संगीतकार, गायक आणि संपूर्ण वाद्यवृंदानी एकत्र येऊन काम करायचं म्हटलं तर आज एका गाण्याची कॉस्ट तीन ते चार लाख होईल! तो म्हणाला, आम्हाला प्रड्युसर सांगतो तुम्ही चाल अशी तयार करा की तिची ‘कॉलर ट्यून’ चांगली झाली पाहिजे! कॅन यू इमॅजीन?
पूर्वीच्या गाण्यांचा माहौल हा एकत्रिकरणाचा एकसंध परिणाम आहे, एकेक शब्द रात्ररात्र विचार करून लिहिलायं आणि एकेक गाणं दिवसेंदिवस रियाज करून म्हटलंय. नौशादजींनी म्हटलंय ‘जो दिलको सुकून दे वो संगीत है! ’ या स्तरावर आता कुणी विचार करणं केवळ अशक्य आहे.
मी आनंदजींना (कल्याणजी-आनंदजी) प्रत्यक्ष ऐकलंय, काय म्हणाले असतील ते? गीतकार गाण्याचा आत्मा आहे! त्यांनी गायक आणि संगीतकार यांच्याही वर गीतकार श्रेष्ठ आहे असं सांगीतलं, कारण, ते म्हणाले, तो प्रथम ती सिच्युएशन, तो मूड शब्दब्द्ध करतो, आम्ही नंतर चाल लावतो आणि गायक मग ती व्यक्त करतो पण शायरच नसेल तर गाणं कसं होईल?
आता संगीतकार ट्यून तयार करतो, अरेंजर मधलं म्युझिक करतो, मग गायक त्यांच्या सवडीनी गातात आणि शेवटी संगीतकार स्वतःच्या हिशेबानी कंप्युटरवर ते सर्व जोडून गाणं तयार करतो. ते गाणं टेक्निकली ठीक असतं पण इंपॅक्ट म्हणून तकलादू असतं, निर्जीव असतं, तुम्हाला ओढ लावू शकत नाही.
तुम्ही फक्त एक संगीतकार घ्या, ओ पी नय्यर, (त्यानी स्वत:ची सर्व कारकिर्द लता मंगेशकरनी अक्षरश: एकही गाणं त्याच्यासाठी म्हटलं नसताना केलीये) आणि त्यानी काय माहौल तयार केलाय पाहा, इशारो इशारोमे दिल लेनेवाले, दिवाना हुवा बादल, ये मेरे हाथमे तेरा हाथ नये जज्बात, इक परदेसी मेरा दिल ले गया, मांगके साथ तुम्हारा, जरा हौले हौले चल्लो मोरे साजना, मैं प्यारका राही हूं, बलमा खुली हवामे.. न संपणारी यादी आहे.
तुमच्या लक्षात येईल आता ते घडणं अशक्य आहे कारण पैसा हेच सर्वस्व झाल्यामुळे कुणी इतक्या फुरसतीनं गाणी करेल हे असंभव आहे! तुम्ही इतक्या चटकन निर्णयाला येवू नका, तुम्हाला त्या अफलातून गायिकेची व्यथा कळणार नाही.
संजय