चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक ।
पारगांवी देख चौथा तो हा ॥
पांचवा मसुरीं, शहापुरीं सहावा ।
जाण तो सातवा शिराळ्यांत ॥
सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा ।
दहावा मानवा माजगावीं ॥
बाह्यांत अकरावा येणेरीती गावा ।
सर्व मनोरथा पुरवील ।
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास ।
किर्ती गगनांत न समावे ॥
- समर्थशिष्या वेणाबाई

===

१५६६ - शहापुर, चुन्याचा मारुती
१५६७ - मसुर, महारुद्र हनुमान
१५७० - चाफळ, दास मारुती आणि प्रताप मारुती
१५७१ - उंब्रज, उंब्रज मारुती
१५७१ - माजगाव, माजगावचा मारुती
१५७३ - बाहे-बोरगाव, बाहे-बोरगावचा मारुती
१५७३ - मनपाडळे, मनपाडळ्याचा मारुती
१५७४ - पारगांव, पारगावचा मारुती
१५७६ - शिरोळे, वीर मारुती
१५?? - सिंगणवाडी, ?????

संदर्भ - महेशची जालनिशी