अर्चना चा मुद्दा पुन्हा एकदा मांडायचा प्रयत्न करतो:
जुने ते सोने आहेच. त्या बद्दल दुमत नाहिच.
पुन्हाः जुन्या गाण्यांच्या महती बद्दल दुमत नाहिच.
आशाताई एक 'आयकॉन' आहेत आणि राहतील. त्यांचा मी आणि कदचित अर्चना ही चाहते राहू.
प्रश्न आजचे संगीत आणि संगीतकार टाकाऊ आहेत की नाही हा आहे. संगीताचा आभ्यासात्मक विचार न करता, ते किती सुश्राव्य आणि आनंद दाई आहे हेही तितकेच महत्वाचे. शंकर महदेवन, ए आर रेहमान, विशाल - शेखर, अजय - अतुल, विशाल भारद्वाज सारखे आजचे संगीतकार, आणि गुलजार, स्वानंद किरकिरे, जावेदसाब अशे गीताकार आजच्या धकाधकी च्या जीवनात आनंद देणारे संगीत निश्चितच देत आहेत. आजचे संगीतकार नवनवीन गायकांना वाव देतात जे आधीच्या काळी होत नसे.
आपल्या आवडत्या व्यक्तीने (आशाताई) आजच्या संगीताला टाकाऊ म्हणले हे कदाचित अर्चनाला आणि निश्चितच मला अधीकच बोचरे बोल वाटले.
अजय देशकर