अतुलजी आशाताईंना ' ग ' ची बाधा झालेली नाही त्या बोलतात ते बरोबर आहे. सध्या माझा मुलगा एक गाणे गातो, शब्द काहीसे असे आहेत की 'हम दोनो रास्कल है' असे काहीतरी आहे मला नीट माहित नाही. मी तर हे कधी ऐकले नाही. पण आता सांगा की हे गाणे किती काळ पर्यंत लोकांना आठवेल? याला म्हणतात 'कल्पना दारिद्र्य'. ' जब तक रहेगा समोसे मे आलू, तेरा रहुंगा ओ मेरी शालू', यात काय 'कल्पना' आहे? आशा, लता, रफी, मुकेश, किशोरकुमार या गायकांची गाणी नुसत्या म्युझिकवरून ओळखता येतात. आजच्या गायकांची नावे नंतर लोकांना आठवणारही नाहीत. तुम्ही म्हणता की हिमेश रेशमियाची लागोपाठची ३६ गाणी लोकप्रिय झाली. ती तुम्ही तरी आज ओळीने सांगू शकता का? शिवाय आशाताईंची सुरुवातीची गाणी नसतीलही हीट झाली. पण ती आजही लोकांना आठवतात. सारेगम सारख्या रियालिटी शो मध्ये नव्या पिढीची मुले ही जुनी गाणीच म्हणतात हे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. मंगेशकर भगिनी या जमान्यातही टिकून आहेत याचे श्रेय त्यांच्या मेहेनतीला आहे. मागे एका कार्यक्रमात श्री. रवींद्र साठे म्हणाले होते की "आजकाल या अशा 'शो' मधून तीन महिन्यात एखादा गायक/गायिका 'महागायक,' 'भारत की शान', 'गौरव महाराष्ट्राचा' वगैरे कसे काय बनतात?"  ही एक साधना आहे. मेहेनतीने मिळवलेलेच काळाच्या ओघात टिकून राहते आणि अजरामर होते. शिवाय आशाताई नव्या सगळ्यांनाच नावे ठेवत नाहीत. पॉप संगीत तर आर. डी. बर्मननी आणले आणि ते आशाताईंनी गायलेही आहे. त्या अशी बेजबाबदार विधाने सरसकट करणार नाहीत.