संजयजी,
अवीट गोडीच्या जुन्या गाण्यांशी मला काहीही वैर नाही, उलट अगदी पंकज मलीक पासून ते शमशाद बेगम सगळेच मला भावतात. आशाताईंची अनेक गाणी खोलवर रुतली आहेत, ती चांगलीच आहेत... पण म्हणून नवीन गाणी किंवा त्यांचे शब्द वाईट आहेत असे आपले म्हणणे आहे का? एकाला मोठे ठरवायला दुसरऱ्याला लहान दाखवण्याची गरज नसते. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे संगीत राहू शकते.