आपले म्हणणे आहे का?
नवीन गाणी तुम्ही तीन चार वेळा ऐकली की वाटतं बास! आणि आपलं लक्ष दुसरीकडे वेधलं जातं. जुनी गाणी आपण तीसतीस वर्ष ऐकतोय, अजूनही ऐकावीशी वाटतात, काय कारण असेल याच? तर ते जीवंत रेकॉर्डिंग आहे, मोहे भूल गये सावरिया नौशादमियांनी भल्या पहाटे, स्टुडिओ संपूर्ण धुवून घेऊन, मोगऱ्याचे गजरे सर्वत्र बांधून, लतानी शुभ्रवस्त्र परिधान केली असतांना, साऱ्या वाद्यवृंदाला त्या मूडमध्ये नेऊन केलेलं भैरव रागतलं काँपोझिशन आहे. तुम्ही जेव्हा ते गाणं ऐकता तेव्हा तो मूड (तुम्हाला इथे सांगीतलेल्या गोष्टी माहिती नसतांना) पुन्हा जीवंत होतो, तो गंध, तो विरह, ती आर्तता तुम्हाला पुन्हापुन्हा स्पर्श करते ही त्या गाण्याची जादू आहे. आज ती लगन, तो कालाचा ठहेराव, तो फुरसतीचा आलम शक्य नाही त्यामुळे ते दिवस, ते संगीत, ती गाणी, ते संगीतकार आता होणं नाही!
संजय